आशुतोश,
अहो, आमच्या हपिसापासून रेल्वे स्टेशनापर्यंत यायला नाही म्हणणाऱ्या मुजोर रिक्षावाल्यांचे फोटो काढून मी तीनचारदा तरी पोलिस स्टेशनात गेलो आहे. अर्धा तास बसून काहीही उत्तर न मिळाल्याने तसाच निघालो आणि शांतपणे(! ) ट्रेन पकडून घरी आलो. जिथे रिक्षावाल्याविरुद्ध तक्रार घेतली जात नाही तिथे पोलिसाविरुद्ध कोण घेणार? आणि आज एकटाच होतो, दुचाकीवर होतो, त्यामुळे पटकन फोटो काढणे अवघड होते थोडे. एरवी असे कैक फोटो काढले आहेत पण ते कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता. अशा प्रकारचा संवाद साधणे आणि फोटो काढणे एकत्र जमणे थोडे कठीण आहे. 
आता स्मार्टफोनमुळे तर वीडिओ काढणे पण शक्य आहे, पण गर्दीच्या रस्त्यावर आवाज रेकॉर्ड होईल का नाही ह्याबद्दल जरा साशंक आहे.
मीराताई,
तो सिग्नल दोन मिनिटांचा तरी असावा. कारण माझ्यामागे येऊन भोंगा वाजवाजवून मला शिव्या घालून बाजूला व्हायला लावलेले त्याने. तेवढ्यात पुढे रस्ता ओलांडणाऱ्या माणसांचा ओघ संपून वाहनांचा सुरू झाल्याने त्याला पुढे जाता आले नाही.
आणि तारांकित भाषेबद्दल - अहो, तरी हा संवाद जेमतेम एखाद मिनिट चालला असेल. पूर्वी एकदा पुण्यात होतो तेव्हा माझ्या घरी चोरी झाली होती आणि प्रभात रोड पोलिस स्टेशनाची पायरी चढायची वेळ आली होती माझ्यावर. त्या दिवशी तिथल्या पोलिसाने 'लाखोली' ह्या शब्दाचा जो अर्थ मला समजावला तसा आजतागायत कोणीही समजावला नाहीये.