तलब या अरबी शब्दाचा अर्थ तीव्र इच्छा, इंग्लिशमध्ये ऍडिक्शन, पेंचन्ट, असा आहे. मराठीत आपण 'व्यसनाकडे जाणारी, न आवरता येणारी तीव्र इच्छा' असा करू शकू. मराठीतला तलफ हा शब्द तलबवरूनच आला असावा. तलबगार म्हणजे अशी उत्कट इच्छा बाळगणारा. तलफ मध्ये आसक्ती आणि कृतीची वारंवारिकता या दोन अर्थांचे मिश्रण आहे.