ह्या पुढचे भाग २,३,४ हे इतरत्र वाचले होते ते खरोखरच सुंदर होते. ध्रुवीय प्रवासाचे मुख्य आकर्षण तर त्या भागांत येऊन गेले. आता तुम्ही एकच करू शकाल. पुढचा पाचवा भाग टाकताना तो मनोगताची कालमर्यादा पाळून इथे टाकू शकाल किंवा मधल्या भागांतली माहिती संकलित करून आणि वेगळ्या पद्धतीने नव्याने थोडक्यात लिहून येथे टाकू शकाल. पण तेही नियमात बसेल की नाही याचा खुलासा आधीच करून घ्यावा हे बरे. शिवाय तुम्हाला एव्हढा सर्व मजकूर नव्याने जुळवावा आणि टंकावा लागेल ते वेगळेच. पण मनोगताच्या वाचकांसाठी ती एक पर्वणी ठरेल हे नक्की.