विक्रम गोखले यांचे अभिनंदन. मराठी चित्रपटसृष्टीसाठी कौतुकास्पद घटना.

या घटनेची इतरत्र फारशी दखल घेतली गेल्याचे दिसले नाही. धागाकर्त्याने ती आवर्जून घेतली यासाठी धागाकर्त्याचे अभिनंदन.

फार पूर्वी श्री. गोखले यांच्या शेतीच्या प्रयोगांविषयी एक लेख वाचला होता. तो मनोरंजक तर होताच शिवाय त्यातून गोखले यांच्या व्यक्तिमत्वातली निसर्गाची ओढ, पर्यावरणाची जाण आणि एकूण जिद्द दिसून आली होती. त्यावेळी या सर्वांगीण व्यक्तिमत्वाविषयी आदर वाटला होता.