मी श्रिनी आणि प्रभाकर यांच्यामताशी पुर्णपणे सहमत आहे. कालच 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' हा सिनेमा टि.व्हि. वर पाहिला. अत्यंत उत्तम, वास्तवाच्या अगदी जवळ जाणारा, सद्द्यस्थिती दर्शवणारा असा हा चित्रपट वाटला. मराठी सिनेमा कात टाकतो आहे, ह्याचे 'श्वास' 'नॉट ओन्ली...' ही उत्तम उदाहरणे आहेत. श्वासला पुरस्कार मिळण्यापुर्वीच तो मी पाहिला होता. त्यावर मनोगतवर चर्चाही झाली होती. हळ्द-कुंकू, सासर-माहेर, पांचट विनोद, रडारड, यातुन मराठी सिनेमा बाहेर पड्तोय, चांगली गोष्ट आहे.

वास्तवाच्या जवळ जाणारा, हृदयाला भिडणारा असा श्वास - मला वाटला. सहजसुंदर अभिनय, उत्तम चित्रिकरण आणि सशक्त कथा हे श्वासचे जमेचे मुद्दे! फारसे नावाजलेले नसले तरीही सहजसुंदर, उत्स्फुर्त अभिनय करणारे कलाकार हे श्वासचे भुषण! हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

आता 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' बद्दल :-

अतिशय बिझी कलाकार घेऊनसुध्दा जर तुमचं प्लानिंग परफेक्ट असेल तर तुम्ही अवघ्या ११ दिवसात संपुर्ण सिनेमाचं चित्रिकरण पुर्ण करु शकता. आदिती देशपांडे यांनी हे सिध्द करुन दाखवलं आहे. हाही वास्तववादी, सशक्त कथा, उत्तम अभिनय आणि उत्तम संवाद असणारा चित्रपट आहे. आता आलेले अशा प्रकारचे चित्रपट पाहिले की असं वाटतं, आपल्याकडेही प्रतिभा आहेच पण आता त्याचबरोबर निर्मत्यांचा द्रृष्टीकोनही बदलतोय. लोकांना काय हवं, ते देण्यापेक्षा, जे चांगलं, उत्तम आहे, ज्यातुन आजच्या पिढीला काहीतरी नवा विचार, नवी दिशा आपण देऊ शकु किंवा सद्द्यस्थिती सादर करुन ही परिस्थिती बदलण्याची प्रेरणा द्यावी असा विचार करुन, फक्त पैसा कमावणं येवढंच उद्दीष्ट न ठेवता चांगलं काहीतरी देण्याचा आजच्या निर्मात्यांचा प्रयत्न दिसतो, हेही नसे थोडके.