राजेंद्र, मीरा, अशोक, सावित्री, महेश, आजानुकर्ण, विसुनाना आणि मन्जुशा सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अशोक पाटील साहेब, आपले म्हणणे बरोबर आहे. त्यानुसार मी माझ्या अनुदिनीवर दुरुस्ती केली आहे. तो दुरुस्त लेख पुढील दुव्यावर वाचता येईल. http://nvgole.blogspot.in/2013/03/blog-post.html

याव्यतिरिक्त आणखी दोन दुरूस्त्या करायच्या आहेत. 

महिला दिनाचे औचित्य साधून लेख प्रकशित प्रकाशित केला. तेव्हा अनुदिनीवरील तिसऱ्या संदर्भात दिलेल्या माहितीचे आधारे अनुपमा डॉक्टर असल्याचे लिहिले होते. कारण टाईम्ससारख्या वृत्तसंस्थेच्या माहितीवर अविश्वास दाखवण्याचे मला काहीच कारण नव्हते. मात्र, माझी तिची भेट होत असे तेव्हा, साधारण वर्षभरापूर्वीपर्यंत तरी ती डॉक्टर झालेली असल्याचे मला माहीत नव्हते. म्हणून मी लेख प्रसिद्ध करत असतांनाच तिला ई-मेलवर ह्या वृत्तास दुजोरा देण्याची विनंटी केलेली होती. त्यावर तिचा प्रतिसाद बराच उशीरा मिळाला. मात्र त्यात ती डॉक्टर झालेली नसल्याचे म्हटलेले होते. ह्यामुळे मी मनोगत प्रशासकांना ही दुरूस्ती करण्याची विनंती केलेली होती. हा प्रतिसादही मी त्यासाठी राखून ठेवलेला होता. परंतु आजवर मनोगतच्या प्रशासकांनी त्यावर कुठलाच प्रतिसाद दिलेला नसल्याने, ही दुरूस्ती इथे प्रतिसादातच नोंदवून ठेवतो आहे. मुळात खात्री केल्याखेरीज मजकूर लिहिल्याखातर मी दिलगीर आहे.

तसेच साप्ताहिक सकाळनेही तिच्या वडलांचे नाव पद्माकर ऐवजी निराळेच लिहिल्याने तीच चूक माझ्याही लेखात पुनरावृत्त झालेली होती. तिने तिच्या पत्रात ही चूकही माझे निदर्शनास आणली. माझ्या अनुदिनीवर आता तीही दुरूस्त केलेली आहे.

अनुपमाने स्वतः टाईम्सला व साप्ताहिक सकाळला दुरूस्तीबाबत लिहूनही त्यांनी ती माहिती अजूनही दुरूस्त केलेली नाही. 
निदान इथे तरी मनोगत प्रशासकांनी, चुकीची माहिती मूळ लेखात तरी राहू नये ह्याकरता, मी अनुदिनीवर केलेले बदल इथेही करावेत ही जाहीर विनंती!