सोनाली....

काव्यसंग्रह पूर्ण होऊन तो आता रसिकांसाठी उपलब्ध होत आहे याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. त्या लिंकच्या आधारे आवश्यक ती माहिती घेतली आहेच. काव्यसंग्रहाचे जुई कुलकर्णी यानी केलेले
मुखपृष्ठ काहीसे पद्मा सहस्त्रबुद्धे यांच्या शैलीची आठवण करून देणारे आहे. मात्र संग्रहातील कविता आणि जुईंची कव्हरची कल्पना यांचे काही नाते आहे का, ते पूर्ण संग्रह वाचल्यावरच शोधता येईल.

संग्रहात समाविष्ठ करण्यात आलेल्या काही कवितांपैकी मी अन्यत्र वाचलेल्या आहेतच. त्यापैकी 'अंत्ययात्रा' मधील....

"...    कुणाचे बालपण
स्मशानाजवळ
असणाऱ्या घरात
जाऊ नये ..."

ह्या ओळीनी मनावर भाजणारा चटका ठसला होता, इतक्या त्या तीव्र आहेत. [असे एक जातिवंत उदाहरण मी फार जवळून पाहिले असल्याने ही कविता खूपच मनी भिडली आहे. ]

या वाटेवरील प्रवासासाठी शुभेच्छा !!

अशोक पाटील