मी माझ्या पगाराचा धनादेश कायम मराठीतच भरत असे, त्याची आठवण झाली. माझी आईही मरेपर्यंत मराठीतच धनादेश लिहीत असे.

सुमारे १९८४-८५ च्या सुमारास मी मुंबईत एमायडीसी भागात नोकरीला होतो. तेव्हा माझा पगार दोन हजार दोनशे कितीतरी रुपये आणि काही पैसे असा असे. तो मी कायम मराठीत भरत असे.

वरील माहिती आनंददायक आहे आणि कै. सुधीर फडके माझ्या आवडीचे मराठी गायक-संगीतकार आणि मराठी उच्चारांबद्दलच्या आदर्शांपैकी एक आहेतच; मात्र 'फडक्यांनी धनादेश मराठीत भरला' अशी काहीशी माहिती कानावर पडली असती तर कदाचित अधिक आनंद झाला असता असे मनात आले. असो.