धन्यवाद गोळेसर....

आपला दुरुस्तीसंदर्भातील वरील प्रतिसाद माझ्याकडे असलेल्या एमटीएस कनेक्शनमधील काही बिघाडामुळे काल वाचता आला नाही.... तो आज आत्ता वाचला.

आपल्या लेखाचा मूळ उद्देश्य अनुपमा कुलकर्णी यानी सर्वसामान्यापासून हटकून असलेल्या क्षेत्रात जे नेत्रदीपक यश मिळविले ते अनुदिनी तसेच विविध मराठी संस्थळे याद्वारे समोर आणणे हेच असल्याने त्यात अनवधनाने राहून गेलेल्या तपशीलातील [त्यातही ज्याला ऍकॅडेमिक म्हटले जाते अशा] चुका क्षम्यच मानाव्या लागतील.

अनुपमा आपली विद्यार्थिनी असल्याने आपला त्यांच्याशी कोणत्याही माध्यमातून संपर्क होत असेल तर माझ्याकडून तसेच इथे पतिसाद देणाऱ्यांकडूनही त्याना हार्दिक अभिनंदन कळवावे अशी विनंती आहे.

अशोक पाटील