संजयजी,
अजूनही त्या ओळी वृत्तात नाही बसल्या हो!

तुमचा आग्रहच असेल आणि त्याने तुम्ही खुश होणार असाल तर केवळ तुमच्यासाठी, तुम्हाला वाटते म्हणून तुमच्या ओळी अशा तऱ्हेने वृत्तात लिहिता येतील.......

असे मी काय वदलो? मज, करावे बाद लोकांनी!
कशी कुठल्याच गझलेला दिली ना दाद लोकांनी?


खुश संजयजी? आल्या तुमच्या मनातील भावाना वृत्तात?  हा तुमच्या मनातला मतला तुम्हालाच अर्पण!

टीप: गझल, वदणे, वाद होणे, उसळती दाद ही सर्व प्रतिके आहेत! त्यांची विशिष्ट गुंफण बरेच काही सांगते.....पहा विचार करून!
आपण शेराचा फारच शारीरिक(शाब्दिक) अर्थ घेता असे दिसते! कुणाच्या गझलेवर, मनोगतावर किती प्रतिसाद आले इतक्या संकुचीत विचारांनी आपण पछाडलेले दिसता! म्हणूनच आपल्याला हा मतला वरीलप्रमाणे करावासा वाटला असावा! असो! मर्जी आपली! पसंद अपनी अपनी, हेच खरे, नाही का?

आमचे खूप जुने दोन शेर इथे द्यावे वाटतात ,जे तुमच्या प्रतिसादात शेवटी तुम्ही विचारलेल्या निरागस प्रश्नाला आमचे उत्तर समजा हवे तर........
................................................................................
चालला फुलांनो तुमचा गंधोत्सव कोणासाठी?
रंगावर भुलते दुनिया गंधावर भाळत नाही!

................................................................................
कोमेजलो, उमललो, कोणास काय त्याचे?
मी रानफूल, माझ्या जवळून कोण गेले?

................................................................................
आपल्या निरागस प्रतिसादची शैली नावाजण्याजोगी आहे!
.............सतीश देवपूरकर