"कमर पतली, नजर बिजली, सुराहीदार गर्दन"
पेपर जरा अवघड होता.
खरे सांगायचे तर अनुवाद तितकासा आवडला नाही, क्षमस्व.
पहिली ओळ वृत्तात बसत नाही--मृगेंद्रकटी हा शब्द मृगेंद्र-कटी असा उच्चारला जातो. तुम्ही त्यास ल गा गा गा ह्या मात्रासूत्रात बसवण्यासाठी मृगें-द्रक-टी केले आहे. [ओळ मला क्लिष्टही जाणवली - कंबूकंठी, मृगारिकटी, षपिंगकटी... अर्थात हा दोष माझ्या तोकड्या शब्दसंग्रहाचा. ]
"शरीर नितळ"चीही तीच वृत्तभंगाची गत. इथे तर 'नितळ काया' हा सोपा पर्यायही उपलब्ध आहे.
झुले धरणी, ... पडे चरणी ... जिथे तारुण्य अवघे"जवानी का ये आलम"चा अर्थ तुम्ही चुकीचा घेतला आहे. "अवघे"ही योग्य नाही, व पर्यायात तुम्ही सुचवलेला "सृष्टी"ही बरोबर नाही. आलम ह्या शब्दाचा एक अर्थ सृष्टी ( हिंदी-संसार) असला तरी ह्या ओळीत त्याचा अर्थ स्थिती, दशा असा आहे. आधीच्या दोन ओळींमध्ये उल्लेख केलेल्या "बदन . .. चिकना,... चमकती ... बाहें" असे तिचे तारुण्य आहे असे कवी म्हणतो आहे, व त्यामुळे त्याची "... फिसलती हैं निगाहें .. तडप जाता है दिल.. " अशी गत झाली आहे, व धरणी झुलू लागली आहे.
"न छूटेगा कभी मुझसे वफा का पाक दामन"साठी
सुटायाच्या... न ह्या माझ्या... कधी रेशीमगाठीहा फारच स्वैर अनुवाद होतो आहे. एका ठिकाणी बांधलेल्या रेशीमगाठी न सोडवताही दुसरीकडे सूत जुळवता येते! त्यापेक्षा तुम्ही दिलेला दुसरा पर्याय त्यातल्या त्यात बरा आहे. टी/ठी यमक घेतल्यामुळे रेशीमगाठी घुसवाव्या लागल्या आहेत असे जाणवते. एकूणात, यमक वेगळे असते तर हा अनुवाद अधिक रसाळ होऊ शकला असता.