पॅंट यालाही मराठी पर्याय नाही. ही दोन्ही वस्त्रप्रावरणे भारतीय नाहीत त्याचा हा परिणाम असावा कदाचित इतर भारतीय भाषातही त्याना समानार्थी शब्द नसावा.
मराठीतला 'विजार' हा शब्द कदाचित नलराजा इतका जुना नसेलही पण रघुनाथपंडिताइतका जुना नक्कीच आहे असे दिसते.
नलदमयंतीस्वयंवराख्यानातल्या ह्या ओळी सुप्रसिद्धच आहेत.
टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी ।
केली विजार वरि डौरहि मौन सेवी ॥
हस्ती करी वलय उंच अशा उपायी ।
भूपे हळूच धरिला कलहंस पायी ॥४३॥
संपूर्ण काव्य येथे पाहावे.अत्र्यांनीही ह्या ओळींचा एक गमतीदार किस्सा 'मी कसा झालो' मध्ये सांगितलेला आहे असे आठवते.