मनोगत हे संकेतस्थळ आपला वाढदिवस साजरा करणार आहे, ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. अगदी थोड्या कालावधीत नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे, वावराच्या आणि वापराच्या सुलभतेमुळे मनोगत लोकप्रिय झाले आहे, वेगळे ठरले आहे.
मनोगताला आणि मनोगताचे मालक श्री महेश वेलणकर यांना माझ्या शुभेच्छा. मनोगतावरील लिखाणात कायम संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होत रहावी, हीच इच्छा.
श्री भोमेंनी मनोगताच्या वाढदिवसासाठी वटपौर्णिमा हा दिवस छान निवडला आहे. माझा त्यांना याबाबत नैतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक शक्य नाही म्हणून राजकीय, ऐतिहासिक, कायदेशीर, गंमतीशीर पाठिंबा आहे.
चित्तरंजन भट