शाळेतल्या अर्ध्या चड्डीच्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्या शाळेत इ. आठवीनंतर मुलांना फुल पँट घालायला परवानगी होती. मात्र काही थोराड मुलांना प्राचार्यांची परवानगी घेऊन इ. सहावीपासूनच फुल पँट घालायला मिळत असे हे आठवते.