हा उपयोग निश्चितच विदर्भापुरता मर्यादित नाही हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. आमच्या घराण्यापैकी कोणी विदर्भाशी संबंधित नाही. शिवाय सर्वांचीच मातृभाषा मराठी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या बऱ्यापैकी मोठ्या खेडेगावात हा शब्द बोलीभाषेत खूप वेळा वापरला जातो. (साधारण १५-२० वर्षे जुना असा दूरदर्शन किंवा वर्तमानपत्रातून हिंदीमिश्रित मराठी दररोजच ऐकता/वाचता येण्यापूर्वीचा हा काळ आहे आहे वाटते). हिंदीचा प्रभाव असला तरी स्वतंत्रपणे मराठी शब्द/क्रियापद म्हणून हा शब्द शब्दकोशात का नाही याचे नवल वाटले.