मी खाद्यपदार्थ असावा असे समजून या कुकीकडे दुर्लक्ष केले. क्षमस्व.

कुलपाचे किस्से आवडले. विशेषतः तुमच्या मैत्रिणीचा किस्सा आवडला. तिचे झुरळाला नजरेने दटावणे. ए-ए-ए करत थांबविणे. हीहीहीहीहीहीही. आपली निरीक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी सूक्ष्म आहे.

मी स्वतः अतिशय विसरभोळा, वेंधळा असल्याने किल्ल्या हरविणे ही माझ्यासाठी नित्याची बाब आहे. एकदा बऱ्याच रात्री माझ्या स्कूटरची किल्ली हरवली दिसत नव्हती, तेव्हा मला गाडीचे हँडल लॉक वगैरे तोडावे, फोडावे लागले. ही सगळे तोडफोड झाल्यावर मला कळाले की मी भलत्याच्या स्कूटरचे लॉक तोडले आहे. असो.

मी पुन्हा जानवे घालण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण किल्ल्या सुरक्षित राहतील, गळपटणार नाहीत हे होते.

चित्तरंजन