मलाही वाटते तो शब्द 'इतरत्र'च असावा. माझ्याकडे मोल्सवर्थची छापील प्रत आहे. त्यातून ह्या उताऱ्याचे चायाचित्र काढले, ते खाली डकवले आहे.

जालावरील कोशात दिले आहेत तसे उच्चार छापील शब्दकोशात दिलेले नाहीत. त्यामुळे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ओसीआर करताना 'त्र'ला ञ समजून तसा उच्चार (n) दिला असेल. ह्याच्या पुष्ट्यर्थ मोल्सवर्थ कोशाच्या सुरुवातीला असलेली खालील नोंद पहा (लाल अधोरेखन माझे)

ह्यावरून असे वाटते की कोशात ञ न वापरता अनुस्वार वापरले असणार. तेव्हा हा शब्द इतरञ नसून इतरत्र असावा.