पहिली ओळ वृत्तात बसत नाही--मृगेंद्रकटी हा शब्द मृगेंद्र-कटी असा उच्चारला
जातो. तुम्ही त्यास ल गा गा गा ह्या मात्रासूत्रात बसवण्यासाठी
मृगें-द्रक-टी केले आहे.
अर्रर्र असा नियम आहे काय? म्हणजे एका गाचे दोन ल केले तर ते दोन ल दोन निरनिराळ्या शब्दात जाऊ नयेत? ह्म हम
पण येथे मृगेंद्रकटी असा एकच शब्द झाला ना? येथे मृगेंद्र किंवा कटीबद्दल काही म्हटलेले नाही. ... (अजून काहीतरी सॉलीड समर्थन शोधले पाहिजे नाहीतर हा नियम गळ्याशी लागायचा राव
)
व त्यामुळे त्याची "... .. " अशी गत झाली आहे, व धरणी झुलू लागली आहे.
पटले नाही. मूळ गाण्यात धरणी झुलण्याच्या ओळीत अत्यंत आदर करणे अशा अर्थी एक वाक्प्रचार वापरलेला आहे. तारुण्य अत्यंत आदर करत आहे असा... त्यावरून मी तारुण्य पायी पडत आहे असा अर्थ केला. म्हणजे जेथे धरणी झुलते आणि तारुण्य तुझ्या पायी पडते, तेथे मी लुब्ध कसा नको होऊ ... असा.
एका ठिकाणी बांधलेल्या रेशीमगाठी न सोडवताही दुसरीकडे सूत जुळवता येते
असे असते म्हणता? असेल असेल. मला तितका अनुभव नाही हो
(प्रतिभा तर कधीच नव्हती म्हणा
)
टी/ठी यमक घेतल्यामुळे रेशीमगाठी घुसवाव्या लागल्या आहेत असे जाणवते.
एकूणात, यमक वेगळे असते तर हा अनुवाद अधिक रसाळ होऊ शकला असता.
बरोबर. अहो,नायिका कंबुकंठी असल्याने हे सगळे 'गळ्याशी' आले
तेथे एकदा ठी ने ठिय्या दिल्याने बाकी फार वाव राहिला नाही.
शिवाय अंतर्यमके जमवायचे शिवधनुष्यही उचलायचे होते, त्यामुळे रचना काही ठिकाणी क्लिष्ट तर काही ठिकाणी भाषांतर स्वैर अशी तडजोड केली. ... पण मजा आली.
तुम्ही परीक्षेची धार कायम ठेवली आहे त्यामुळे तिच्यात पास होण्याचा प्रयत्न करण्यात जास्त धमाल येत आहे.
असाच लोभ राहू द्या.