सकाळी सकाळी मन प्रसन्न करून टाकले श्री. सुधीर कांदळकर यांच्या या वार्तांकन स्वरुपाच्या देखण्या लेखाने. पुस्तके हाताळणे हे जितके आनंददायी तितकेच त्याविषयी वाचणे आणि त्यावरही कडी म्हणजे लेखाच्या संदर्भाने इथे अवतरलेली प्रकाशचित्रे पाहणेही. सध्याच्या वेगवान जगात [तसेच टीव्हीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात... ] "पुस्तक" नामक काहीतरी जादू असू शकते हे आताच्या पिढीला पटवून द्यायचे असेल तर मालवण आणि तत्सम छोट्याछोट्या
वाडी धर्तीच्या गावात भरणारी असली मन भारावून टाकणारी प्रदर्शने मोलची कार्य करीत आहेत
हे त्यांच्या नजरेसमोर आणणे त्या त्या शिक्षकाचे/पालकाचे महत्त्वाचे कार्य होईल असे म्हटले पाहिजे.
"मालवणी हापूस" आणि "मालवणी खाजा" यांच्या तोडीस तोड असे कार्य श्री. कांदळकर यांच्या लेखात उल्लेख झालेली ग्रंथप्रेमी मंडळी करीत आहे असे मी नक्की म्हणेन.
धन्यवाद तुम्हाला सर.
अशोक पाटील
[काहीसे अवांतर : फोटोग्राफरसाठी तुम्ही 'प्रतिमाग्राहक' असे देशी रुप वापरले आहे. असे मराठी नाम मी प्रथमच वाचले. या नामाची निर्मिती तुम्ही स्वतः निर्माण केली आहे की कुठे अन्यत्र वाचनात आले होते ? बाकी नाम छानच आहे. ]