निळी आणि खाकी अर्धी चड्डी.... हे उल्लेख मलाही "डाऊन मेमरी लेन" कडे घेऊन गेले. माझ्या शालेय काळात विद्यार्थ्यांसाठी पांढरा हाफ शर्ट आणि खाकी हाफ पॅण्ट हाच प्रचलित पोशाख असायचा. पॅंटला 'चड्डी' असे म्हणवतच नसे. खाकी रंगाचा बाकी अगदी वीट आला होता, त्यामुळे ज्यावेळी हायस्कूलला दाखल झालो आणि शेजारीच असलेल्या आय. टी. आय. इमारतीतील शिकावू मुले निळी पॅण्ट घालताना [फुल आणि हाफही] पाहिले त्यावेळी मनी आले की आपल्यालाही घरातील लोकांनी इकडे शाळेत ग्यानबातुकाराम शिकायला पाठविण्याऐवजी आयटीआय मध्ये मेकॅनिकचे काम शिकायला पाठवायला हवे होते.
रस्त्यावरील ट्रॅफिक पोलिसही आमच्या काळात खाकी हाफ पॅण्टवरच ड्युटी करायचा. पोलिस कॉलनिही आमच्या गल्लीशेजारी असल्याने त्यांच्या बायकांनी बाहेर दोरीवर वाळत घातलेले बनियन्स आणि अर्ध्या चड्ड्या पाहून पाहून
डोळे मेलेच होते.
त्यामुळे असेल कदाचित पुढे दसरा चौकात नित्यनेमाने होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कवायती पाहताना त्यांच्या अर्ध्या खाकी चड्ड्या कधी खटकल्या नाहीत. किंबहुना कवाईतीनंतर क्वचित प्रसंगी होत असलेल्या एखाद्या व्याख्यानासमयी सारे स्वयंसेवक शिस्तीने जमिनीवरच मांडी ठोकून ज्यावेळी बसत त्यावेळी त्या अर्ध्या खाकी चड्डीने त्याना काही प्रमाणात का असेना पण आरामच मिळत असणार असे वाटत असे.
छान लेख.
अशोक पाटील