बाबुजींची भूमिका योग्य होती यात दुमत नाही, पण हिंदी वा मराठी भाषेत लिहिलेला धनादेश स्वीकारावा की नाही, याबद्दल स्वागतकक्षेतील त्या मल्याळी मुलीची अडचण समजण्यासारखीच मानली पाहिजे.
काही झाले तरी ती तेथील एक कर्मचारी [तेही खाजगी आस्थापनातील] तेव्हा तिने वरिष्ठांना विचारून घेते असे जे म्हटले असेल त्यात अयोग्य असे काही मानू नये. एखादी पुणेकर मुलगी पॉण्डेचरी येथील इस्पितळात तशाच नोकरीवर/पदावर असेल आणि तिथे तिच्यासमोर तेलुगू किंवा मल्याळी भाषेत लिहिलेला चेक आला तर तिचीही तो चेक स्वीकारण्याबद्दलची भूमिका अशीच असू शकेल.
असो.... थोडेसे अवांतरही लिहितो : श्री. तात्या अभ्यंकर यानी त्या मुलीचा 'मल्लू' असा जो उल्लेख केला आहे, तो खटकला. मी केरळ फिरलो आहे.... राहिलोही आहे त्या भागात काही काळ. तेथील अनुभवावरून सांगू शकतो की, मल्याळी मुलीं 'मल्लू' ही एक प्रकारची हिणकस अशी शिवी मानतात... "लो लेव्हल गर्ल" या अर्थाने घेतला जातो तो उल्लेख..... जसे आपल्याकडील मुलींना 'घाटण' म्हटले की राग येतो, तसाच काहीसा प्रकार. अमेरिकेतदेखील कृष्णवर्णीय लोक आपला 'नीग्रो' असा उल्लेख समोरच्याने शिवी दिली असे मानतात. तिथे कलर्ड पीपल असे म्हणावे असा आग्रह धरला जातो.