मराठीचा अभिमान वाटला असता तर बरे वाटले असते.
'बाबूजीं'ना नेमका कशाचा अभिमान वाटावा, ही 'बाबूजीं'ची वैयक्तिक बाब असावी, नाही का? मग त्या परिस्थितीत, त्याबद्दल बरे किंवा वाईट वाटून घेणारे आपण (तुम्ही, मी किंवा अन्य कोणी) नेमके कोण?
(व्यक्तिशः, एक लिहून झालेला आणि वैधतः पूर्णतः स्वीकारार्ह असा धनादेश हा केवळ भाषेच्या अट्टाहासापायी फाडून टाकून त्या जागी दुसरा धनादेश लिहिणे हे मला कागदाच्या अपव्ययाचे लक्षण वाटते, आणि त्या फाडून टाकलेल्या धनादेशामागे व्यर्थ गेलेले एका झाडाचे बलिदान शोचनीय वाटते. पण मला विचारतो कोण... आपले, 'पण लक्षात कोण घेतो'? असो.)
आमच्या मालवणात हिंदीला कुत्रे देखील विचारत नाही.
मालवणातील कुत्र्यांसही इतर कोणी फारसे विचारत नाही (फिट्टंफाट!), यामागे कदाचित मालवणातील कुत्र्यांची स्थानिक बोली इतरेजनांस अवगत नसावी, ही भाषिक अडचण असावी, असे वाटते.
(म्हणजे, आमच्या पुण्यातील कुत्र्यांच्या बोलीत 'भूभूभूभूभू' अशा प्रकारे विचारला जाणारा प्रश्न मालवणच्या (कुत्र्यांच्या) बोलीत नेमका कसा विचारतात, हे केवळ मालवणकर (कुत्री)च जाणोत. तेथील स्थानिक उच्चार आम्हांस ते काय कळणार? उलटपक्षी, मालवणी (कुत्र्यांच्या) बोलीत, न जाणो, पण 'भूभूभूभूभू'चा भलताच काही अर्थ निघायचा, नि आफत ओढवायची! त्यापेक्षा, 'कशांस तें? आम्हांस नको! ' म्हणून सोडून दिलेले परवडले, नाही का? )