इतरणे हा शब्द आमच्याकडे चांगला प्रचलीत आहे. त्याचा अर्थही हिंदी "इतराना" पेक्षा थोडा वेगळा जातो.
इतरणे या शब्दाला आमच्याकडे पर्यायी शब्द आहेत जसे की, येलणे, येल पाडणे पण शुद्ध/प्रमाण/लिखीत पुस्तकी भाषेत या शब्दाला पर्यायी शब्द असेल असे वाटत नाही.
इतरणे = येलणे = येल पाडणे = स्वत:चे कौतुक दर्शविणार्‍या शरीर-अवयवाच्या नखरेल पण असंबद्ध हालचाली करणे, असा काहेसा अर्थ