रंगपंचमी किंवा धुळवडच कशाला, कोणत्याही सणाला, किंबहुना कोणत्याही प्रसंगी पाणी वाया घालवणे योग्य नव्हेच. आणि पाणीच काय, इतरही नैसर्गिक संसाधने म्हणजे वीज, कोळसा, खनिज तेल हे सर्व काटकसरीने आणि तारतम्याने वापरणे योग्य आहे. अन्नधान्ये, कपडालत्ता यांनादेखील हीच गोष्ट लागू पडते. पण सध्याच्या उपभोक्तावादाच्या काळात असे सांगणे म्हणजे कंजूष किटकिटी वृत्ती असे समीकरण झाले आहे.
पण इतरत्र दुष्काळ आहे म्हणून सर्वच लोक साधेपणा अंगीकारतील अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. काही जणांना यात उगीचच अपराधगंड का बाळगावा असेही वाटू शकते.