क्रमशः असावे या अपेक्षेने आनंद झाला. समकालीन विशेषण वापरायचे, तर 'जबराट'!

आमचीही एक आठवण दुचाकी शिकतानाची : साधारण चालवायला येऊ लागल्यावर एका थोड्या निर्जन रस्त्यावर (होय, त्या काळी असे रस्ते असत. ) पुढील प्रयोगांसाठी गेलो. सुरक्षितता आणि मदत यासाठी पिलिअन सोबत घ्यावीच लागली होती. रस्ता आणि परिसर निर्जन म्हणजे निर्वाहन होता, पण निः प्राणिमात्र नव्हता.  अचानक एक कोंबडी मध्ये आली. कोंबड्या सहसा तुरूतुरू वगैरे चालतात पण ही फडफडत आणि माझ्या नंतर झालेल्या मतानुसार तडफडत आणि तडमडत आली. स्कूटरसकट आम्ही 'महीसंगे फार दुःखित' झालो. कोंबडी पळाली आणि आम्ही लंगडी घालीत घरी गेलो.