बाबुजींचे पाळण्यातील नाव 'राम' होते... आडनाव फडके असेच होते. कोल्हापूरात आजही ह्या फडके घराण्यातील मंडळी राहतात. बाबुजीनी एचएमव्ही कंपनीकडून त्याना रेकॉर्डिंगची ऑफर आली त्यावेळी त्या करारपत्रात 'राम' ऐवजी 'सुधीर' असे केले आणि मग तेच पुढे कायम झाले. ही गोष्ट १९४१ मधील. १९४५ पासून त्यानी संगीत दिग्दर्शक "सुधीर फडके' असा पुढील नामवंत असा प्रवास केला. त्यामुळे गोवा मुक्तीसंग्रामातील त्यांच्या सहभागात हे नाव बदलण्याचा
काही प्रसंग आला नाही.
अर्थात तुम्ही उल्लेख केलेले 'राम मराठे' हेही संगीत क्षेत्रातील एक दमदार नाव होतेच. पंडित राम मराठे यांचे धाकटे बंधू 'अनंत मराठे' यानीही आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट कारकिर्द गाजविल्याचा दाखला आहे.