हा चित्रपट मी मागच्याच महिन्यात पाहीला होता, पण पाहून माझी साफ निराशा झाली; विशेषतः याबद्दल इतके ऐकले होते म्हणून.
माझ्यामते या चित्रपटाच्या कथेत मोठमोठी तार्कीक भगदाडे आहेत. एखादा वेगळा विषय सादर करताना तर्काची कास सोडलीच पाहीजे असे नाही. शिवाय, आक्रस्ताळेपणे आरडाओरडा करणे आणि हसताहसता त्यातून रडू लागणे ही अजूनही आपल्याकडे अभिनयाची सर्वश्रेष्ठ परिमाणे मानली जातात असेच मला हा चित्रपट पाहून वाटले.
हा चित्रपट प्रस्तुत चर्चेचा विषय नाही याची मला जाणीव आहे, पण पुरेशा लोकांना रस असल्यास यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा BB उघडायला हरकत नाही.