धन्यवाद महेश...
३.३० म्हणजे तशी ती रुढार्थाने पहाटेची वेळ नव्हती. चालताना काहीसा धास्तावलो होतो हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. नुकताच म्हणजे ऑगस्ट २०१२ मध्ये पुण्याच्या गजबजलेल्या जंगली महाराज रस्ता आणि संभाजी पार्क या भागात एकापाठोपाठ एक असे तीनचार बॉंब स्फोट झाले असल्याने पोलिस खात्यांने गस्त तिखट केली आहे असे वाचनात होते.... मी दिलेले उदाहरण दसरा आणि दिवाळी दरम्यान काळातील असल्याने मला नक्की वाटत होते की त्या पहाटेच्या वेळी एखादी का होईना पण पोलिस व्हॅन तेवढ्या पट्ट्यात दिसणारच. तसे झाले आणि माझी चौकशी झालीच तर ओळखीसाठी माझ्याजवळ योग्य ती कागदपत्रे होतीच, शिवाय मोबाईलवरून मुलालादेखील जागेवर बोलावून घेता येणे शक्य होते....
.... पण तसे काहीच झाले नाही. गस्तीची पोलिस व्हॅन तर दूरच पण अध्येमध्ये एखादा काठी आपटत जाणारा गुरखाही त्या दोन अडीच तासात मला कुठे भेटला नाही.
बाकी तुम्ही सांगितलेले बॉस्टनच्या 'वॉक फॉर हंगर' चे उदाहरण छान आहे....
२० मैल म्हणजे साधारणतः ३२ किलोमीटर होणार... तसे काहीसे जास्तच वाटते, पण मित्रांची कंपनी असेल तर इतके अंतर सहज कापले जाते.
दुसऱ्या दिवशी घरी बसायची वेळ आली होती असे तुम्ही म्हटले आहे.... पण तसे बसणेही आनंददायीच वाटले असणार.