विनायकराव यानी हा विषय इथे छेडलाच आहे तर या निमित्ताने सांगू इच्छितो की, गेली कित्येक वर्षे रेडिओ सिलोन तसेच अन्य अनेक आकाशवाणी केंद्रावरून दर महिन्याच्या एक तारखेला हमखास ध्वनीक्षेपीत केले जाणारे किशोरकुमारच्या आवाजातील 'खुश है जमाना आज पहिली तारीख है... ' हे गाणे बाबुजी यांचेच.