मीरा फाटक यानी केलेल्या खुलाशाबाबत लिहित आहे की, त्यानी 'राजभाषा' आणि 'राष्ट्रभाषा' या दोन संज्ञांमध्ये अंतर ठेवलेले दिसत नाही.

आपला मुद्दा अगदी बरोबर आहे. राष्ट्रभाषा आणि राजभाषा ह्या दोन संज्ञा भिन्न आहेत हे मलाही माहीत आहे. अधिकृत माहिती सापडल्यावर प्रतिसाद पाठवावा की नाही असाही प्रश्न माझ्यापुढे पडला होता.

परंतु पुन्हा विचार केल्यावर लक्षात आले की भारतीय घटनेमध्ये  हिंदी भाषेचे स्थान इतर भाषांपेक्षा वेगळे आहे हे त्या मजकुरातून स्पष्ट होत आहे आणि त्यातून प्रश्नकर्त्यांचे समाधान होईल. 

तसे समाधान झाल्याचे प्रश्नकर्त्यांनी आपल्या प्रतिसादात  म्हटलेही आहे.