मी विविध प्रकारची फुलझाडे ( जास्वंदीचे ८ प्रकार, मोगर्याचे ३ प्रकार , शेवंती, गुलाब , जाई, सायली , अबोली , कृष्ण कमळ, लिली , निशिगंध ,
झेंडू , डबल तगर , गोकर्ण , गणेश वेल) काही शोभेची झाडे , तुळस , लावली आहे. एका पसरट गोल कुंडीत कमळ ही होते... कालच ती कुंडी फुटली. य व्यतिरिक्त हिरवी मिरची , कढिलिंब , टोमटो , अळू , लसूण , पुदिना , ओवा, कायम असतात.भेंडी , तोंडली, वालपापडी , पडवळ अधुन मधून लावते .मेथी , कोथिंबीर , पालक सुद्धा लावते, पण पक्ष्यांपासून फार जपावे लागते .