... 'बाबूजीं'च्या राष्ट्रभाषाप्रेमाचा खरोखरच गौरवास्पद म्हणण्यासारखा असा जो आविष्कार आहे, तो कोणाच्या१ गावीही नाही, अन् कधीकाळी कोणीतरी इंग्रजीतून एक धनादेश तो काय लिहिला, तो बाबूजींनी फाडायला काय लावला, नि त्याऐवजी स्वतः हिंदीतून दुसरा धनादेश तो काय लिहून दिला, नि प्रतिपक्षाने तो स्वीकारला नाही, तर (वेळ काय, प्रसंग काय... ) हुज्जतच काय घालत बसले, त्याचे कोण कौतुक!
असो, चालायचेच! मोठ्यांच्या छोट्या गोष्टी, त्यांसी देती सर्व मान, आणखी काय?