प्रवास करणे आणि तो आवडला भावला की अन्यांच्यासमवेत त्यातील आनंद वाटून घेणे म्हणजे नेमके काय ? असा प्रश्न कुणी विचारला तर श्री. चौकस यांचे हे लिखाण त्याला किंवा तिला द्यावे म्हणजे आपसूकच योग्य आणि सुंदर असे उत्तर मिळून जाईल.
आम्हा कोल्हापुरकरांना आंबोलीमार्गेच गोवा जवळ आणि सोईचे पडत असल्याने शुक्रवारी रात्री इथून गाडीला किक मारली की मध्यरात्रीपूर्वीही म्हापुश्यात अगदी तोंडालाच असलेल्या जीटीडीसीच्या हॉटेलमध्ये गाड्या पार्क करता येत असत. असली खोली रिकामी तर घेतली नसली तर काऊंटरवर असलेल्या मॅनेजरला विनंती करून गेस्ट रूममध्ये जाऊन पथारी पसरायची ही शक्कल नेहमीच कामी आली होती.
[अर्थात आता वयोमानानुसार 'बुलेट' ची झिंग पुरती ओसरली, जोडीदारही पांढऱ्या केसांचे झाले असल्याने टू व्हीलर्स कायमच्या गॅरेजमध्ये गेल्या आहेत. पण गोव्याने खुणावणे अजिबात बंद केलेले नाही.... आता जायचे झाल्यास फोर व्हीलरशिवाय पर्याय नसतो... पण जातोच. ]
बाकी चौकस यानी 'परकाश + गर्लफ्रेंड' चे सांगितलेले किस्सेही वाचनीय आहेत. होप, निदान या तारखेपर्यंत मि. परकाश त्या गर्लफ्रेंडच्या दुखण्यातून मुक्त झाले असतील.
काणकोणविषयी आणखीन जादाचे वाचायला मिळेल असे वाटले होते. फारच सुंदर बीच आहे हा... विशेष म्हणजे म्हापुसा आणि पणजी या गर्दीच्या गावांपासून फटकून अगदी कर्नाटकच्या सीमारेषेवर.... [याच बीचवर 'बोर्न ' सीरिजमधील दोन नंबरच्या चित्रपटाचे - बोर्न सुप्रीमसी - चे शूटिंग झाले होते.
असो. एका सुंदर वाचनाचा अनुभव मिळाला.