आणि हो
१. ज्या पाईपने पाणी देणार आहात तिला तोटी-जोड बसवून घ्या म्हणजे पाण्याच्या वापरावर तिथल्या तिथे
नियंत्रण ठेवता येईल. नाहीतर कसं होतं, शेवटच्या झाडाला पाणी घालून झालं की मुख्य नळ बंद करण्यासाठी परतताना पाईपमधून
पाणी वाहतच राहतं, अन्यथा पळत यावं लागतं.
२. संपूर्ण बागेत कुठेही पायऱ्या ठेवू नका. अख्खी बाग ही एकाच पातळीत असू द्या. नाहीतर मग, दोन-चार झाडांसाठी काही पायऱ्या चढा
परत उतरा. असं सारखं करत बसावं लागतं.
३. पाईपला शॉवर-जोडही बसवा. म्हणजे पाण्याची तीक्ष्ण धार न येता पाऊस-सदृश पाणी घातलं जाईल. मनालाही छान वाटेल, विशेषतः
उन्हाळ्यात.
४. सावली साठी, फुलांची, भाज्या अशी साधारण वर्गवारी करा. घरात इतर भागात वापरून झालेलं पाणी बागेत सोडण्याची व्यवस्था होत
असेल तर पहा. (अपवाद, अर्थात् स्नानगृह व शौचालय.)
५. आणि सर्वात महत्त्वाचं, बाग पूर्ण झाल्यावर तिथे संध्याकाळी सहकुटुंब खुर्च्या टाकून बसत चला. (हा हा हा हा... )
आय होप, मी फार आगाऊपणा करीत नाही या सूचना देऊन.
आपला,
कृष्णकुमार द. जोशी
कोल्हापूर.