फ्लॅटमध्ये (गच्ची असेल तर फारच छान, पण नसेल तरी किमान एक ७' गुणिले ७' एवढ्या जागेत अवश्य भाज्या लावता येतील पण उपलब्ध जागेनुसार काही मर्यादा येवू शकतात.पण फ्लॅटमध्ये आपण खालील भाज्या लावू शकतो. (सगळ्या लावण्याइतपत जागा असेल तर सगळ्याच लावू शकतो. )
फळभाज्याः
मिरच्या, टोमॅटो, "वेल"सेटल्ड मंडळी, म्हणजे वेलीवर वाढणारी, पापडी, दोडका, काकडी, दुधी वगैरे.
पालेभाज्याः
पालक, मेथी, कोथिंबीर
ज्या भाज्यांची मुळं फारशी खोलवर जात नाहीत त्या भाज्या आपण लावू शकतो.
काय करायचं, एक पत्र्याचा ट्रे बनवून घ्यायचा, साधारण एका टेबल-टॉपएवढ्या आकाराचा( ४ फूट गुणिले ३ फूट)
त्यात माती घालून धणे, मेथ्या किंवा मिरचीच्या बिया पेरायच्या. ट्रे मोठा घेतल्यास एकाच ट्रेत दोन भाज्या लावता येतील.
पालेभाज्या शक्यतो उन्हात (उन्हाळ्यातल्या) नको ठेवायला.
आणि वेलींसाठी कठडा (गॅलरीचा किंवा बाल्कनीचा) वापरायचा. पण "वेल" शुड बी "वेल" कंट्रोल्ड.
नाहीतर मग, "प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे होउन जाते ह्यांची दशा, लोंबतात ह्या अपुल्या दारी, शेंगा जाती अन्य दिशा"
असो. तुमच्या प्रकल्पास शुभेच्छा......
पूर्ण झाल्यावर एक छायाचित्र पाठवा.