या विषयामध्ये रुची असलेल्यानी खालील पुस्तक आवर्जुन वाचावे.
मनस्विनी प्रवासिनी ( ब्रिटिश पर्व) .
लेखिका > अंजली किर्तने.
प्रकाशक > नवचैतन्य प्रकाशन मुंबई.
तोंडओळख.
ब्रिटिशांचे जसे जसे भारतामध्ये हातपाय पसरु लागले तसे तसे त्यांना कर्तुत्ववान आणि मेहनती आधिकाऱ्यांची आवश्यकता भासू लागली. त्या प्रमाणे अनेक ब्रिटीश तरुण भारतात आले आणि त्याबरोबर त्यांच्या बायका आल्या. येथील समाजाचे मर्मज्ञ निरीक्षण, आपण काहीतरी निर्माण करत आहोत ही भावना आणि येथील स्थिती आपल्या नातेवाईकाना समजावी म्हणून केलेला दिर्घपत्रव्यवहार यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
मुख्य व्यक्तिरेखा.
१. इझाबेला फेन > १८३६ च्या सुमारास भारतीय युध्द प्रमुखाची मुलगी.
२. शार्लट कॅनिंग > १८५७ च्या समराच्या वेळेस भारतात लॉर्ड कॅनिंग ची अर्धांगिनी म्हणून आली. भारतात न्याय आणि सुयवस्था नांदावी म्हणून केलेले प्रयत्न. राणी ची विशेष मैत्रीण.
३. लेडी विल्सन > पंजाब मधील एका जिल्हाधिकाऱ्याची पत्नी. पतीच्या कार्याबद्दल आदर आणि सहभाग. स्त्रींयाच्या आरोग्य आणि शिक्षणामध्ये विशेष रुची. ( १८८०)
४. मेरी कर्झन > भारताच्या व्हाईसरॉयची बायको. अमेरीकन वंशाची. पतीच्या कार्याला प्रेरणा देणारी. ( १९०० ते १९१०)
५. बिऑट्रिस बेब > केवळ चारच महिने भारतात आली आणि भारताच्या राजकारणा बद्दल आपुलकी, प्रेम आणि सद्भावना ठेवणारी.
२५० पानाचे पुस्तक वाचण्यास सुरवात केल्यानंतर संपल्याशिवाय ठेववत नाही. ब्रिटिश पर्वाची उजल बाजू मांडण्यात निश्चितच यश प्राप्त खालेली कादंबरी / लिखाण.
द्वारकानाथ