बरेच दिवसांनी प्रतिसाद देतोय. पण ही कविता पूर्णपणे आत उतरायला काही दिवस लागलेच. ध्रुवपदाच्या दोन ओळी खाऊनच जातात. पहिल्या ओळीत निर्माण झालेली एका सुंदर संध्याकाळीची अपेक्षा दुसऱ्याच ओळीत तुम्ही निष्ठूरपणे खुडलीत. नंतरची कडवीसुद्धा काही उदात्त वाटेपर्यंत वास्तवाच्या दरीशी आणून उभे करतात. फारच भिडणारी रचना.

काही शंका व सूचना : 'वावटळी' हा शब्द वावटळ शब्दाची सप्तमी आहे असे कविता वाचून कळते पण शीर्षकावरून ते प्रथमा अनेकवचन वाटते. दुसरे म्हणजे 'कुबेर कोणी, कुणी करी सौदा स्वस्तात' या ओळीत कुणी आणि करी हे ऱ्हस्वांत हवे का ? बहुधा शुद्धीचिकित्सकाने आपले काम केलेले असावे.

फारा दिवसांनी एक सुंदर कविता वाचली. धन्यवाद.