आजानुकर्ण, हर्षल खगोल - अभिप्रायांबद्दल आभारी आहे.
कात, रात वगैरे शब्द हे इतर कडव्यांच्या (दीर्घ) यमकांपेक्षा वेगळे (र्हस्व) असल्याने म्हणताना थोडा गोंधळ उडतो काय?- मला तरी तसे जाणवले नाही.
वावटळी' हा शब्द वावटळ शब्दाची सप्तमी आहे असे कविता वाचून कळते पण शीर्षकावरून ते प्रथमा अनेकवचन वाटते.- बरोबर आहे. पण ह्या शीर्षकाचा मोह टाळता आला नाही. असाही विचार केला की शीर्षकावरून ते अनेकवचन वाटल्याने काही बिघडत नाही आहे. किंबहुना अर्थाचा आणखी एक पदर मिळतो.
'कुबेर कोणी, कुणी करी सौदा स्वस्तात' या ओळीत कुणी आणि करी हे र्हस्वांत हवे का ? बहुधा शुद्धीचिकित्सकाने आपले काम केलेले असावे.- नाही, आहे ते बरोबर आहे. कवितेच्या सर्व ओळींत २२ मात्रा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
तार्यांचा घेऊन पदर चमचमते रातह्या ओळीत मात्र २३ मात्रा भरताहेत. परंतु उच्चारणात (मला तरी) तसे जाणवत नाही. कदाचित मी 'चमचमते'चा उच्चार चम्चम्ते करीत असल्यामुळे माझ्या कानांना ओळ लयीत वाटत असेल.