एकदा मुळशी रस्त्यावर माझ्या बाईकची क्लच वायर तुटल्याने भर पावसात दोन किलोमीटर हाताने बाईक ढकलत (आणखी तीन मित्रांसह पायी वारी करत) जवळच्या एका वस्तीतील मेकॅनिककडे आणली होती हे आठवले. मात्र त्याच्याकडे माझ्या बाईकला लागेल अशी क्लचवायर नसल्याने त्याने माझ्याच वायरला कसलातरी पॅच मारून दिला आणि दहावीस किलोमीटर जाऊ शकेल असा आशीर्वाद दिला.  पुण्यापर्यंत बाईक व्यवस्थित आली.

लतापुष्पा यांचा प्रतिसाद वाचून, एका मित्राने अमेरिकेत एका शहरातून दुसऱ्या शहरात सामान हलवताना भाड्याने घेतलेल्या ट्रकमध्ये डिझेलऐवजी चुकून पेट्रोल भरले होते आणि नंतर चूक लक्षात आल्यावर गॅस स्टेशनवर आम्हा काही मित्रांना बोलावून दुसऱ्या ट्रकमध्ये सामान हलवले होते हा प्रसंगही आठवला.