सगळ्याच ओळी ८- ८- ६ नाहीत. स्वतः शी गुणगुणताना मला खालीलप्रमाणे यती जाणवतातः
सूर्य वितळला,| सागर झाला | सोनसळी
८-८-६
अजून एका| दिवसाची | चिरडली अळी ||धृ||
८-६-८
तार्यांचा घे । ऊन पदर चमचमते रात
वरील ओळीच्या पहिल्या ८ मात्रांनंतरची फोड नक्की कळत नाही. शेवटच्या 'त'ची १ मात्रा धरता येत नसली तरी शून्यही पटत नाही. न, प, द, र, च, म, च, म, आणि त ह्या नऊ लघ्वाक्षरांची एकूण मात्रासंख्या ८ धरावी लागत आहे एव्हढे खरे.
तासाच्या बो । लीवर नागिण | टाके कात
इथे ण+त = १ मात्रा धरावी लागणार, अन्यथा एकूण मात्रासंख्या २३ भरेल. ह्यावर उपाय म्हणून ली हृस्व (लि) करता येईल, पण तसे केल्याने ओळीची लय बिघडते.
कुबेर कोणी,| कुणी करी सौ | दा स्वस्तात
८-८-६
हर्षल ह्यांनी आपल्या प्रतिसादात "स्वस्तात" हा शब्द गा गा (ल) आहे असे म्हटले आहे, पण ते मला बरोबर वाटत नाही. 'स्वस्तात' ह्या शब्दात 'स्व'वर आधीच्या 'स्ता' ह्या जोडाक्षराचा आघात येत नाही. ते लघूच राहते, त्यामुळे अंतिम 'त'ची १ मात्रा धरावी लागेल.
किती काजवे | रात्रीवर | जातात बळी ||१||
८-६-८
उल्कांची ये-| जा रात्रीच्या | अवकाशी
८-८-६
प्रकाश क्षणभर,| अचेत मग | बाहूपाशी
८-६-८
रात्रीचा शृं ।गार मतलबी | दगडांशी
८-८-६
दगडांची अन् |रात्रीची मग | अळीमिळी ||२||
८-८-६
सांजसावळी | च्या मोहाला | काय म्हणू
८-८-६
दीप स्वत:चे | ज्यात पाहतो | ओज चिणू
८-८-६
शिंपल्यात का ।ळ्या मोत्याचे | बीज जणू
८-८-६
अशाच संयो | गे भरते | रंगेल खळी ||३||
८-६-८. पण ".. ̱गे भरते रं । गेल खळी" असा ८-८-६ उच्चारही करता येतो.
रात्र चिरायू,| चिरंजीव ही | काळोखी
८-८-६
नश्वर तारे, | नश्वर सूर्या |ची शेखी
८-८-६
आंतरज्योती | एक क्षीण | उरली बाकी
८-६-८
विझेल तीही | अंधाराच्या | वावटळी ||४||
८-८-६