अक्षरगणवृत्तांमध्ये मात्र शेवटचे अक्षर लघू असले तरी ते गुरू धरले जाते असे अंधुकसे स्मरत आहे.
हो. मीही तसेच वाचलेले आहे; मात्र तो लक्षात ठेवायला सोपा म्हणून दिलेला नियम असावा असे आता वाटते.
शेवटचे लघ्वक्षर जर संस्कृतातल्याप्रमाणे लांबवले तर ते गुर्वक्षरासारखे होते.
उदा.
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ... येथे शेवटचा शब्द 'चमत्कारिकऽ' असा उच्चारला जातो. क हे अक्षर त्याच्या नेहमीच्यापेक्षा जास्त कालावधी घेते, त्यामुळे ते गुर्वक्षर झाले.
पण
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
(गालगालगालगाल - गालगालगालगाल)
येथे शेवटच्या अंग शब्दातले ग हे अक्षर आहे त्याहून लांबवले जात नाही. त्यामुळे त्याचा कालावधी वाढत नाही म्हणून त्याची एकच मात्रा राहते. म्हणजे ते लघ्वक्षरच राहते.
चू. भू. द्या. घ्या.