मात्रागणनेच्या दृष्टीने ही कविता संपूर्णपणे निर्दोष आहे. तुमच्या वरच्या कवितेत सगळीकडे ८-८-६ अशाच मात्रा बिनचूकपणे होतात.
कृपया येथे पद्मगणाविषयी जो ऊहापोह आहे तो वाचावा.
तुमच्या ह्या कवितेत ताल कसा आहे ते पाहू.
।शिंपल्यात का ।ळ्या मोत्याचे । बीज जणू
येथे शिं, ळ्या आणि बी ह्या अक्षरांवर तालाची टाळी पडते.
ह्या लागोपाठच्या टाळ्यामध्ये ८ - ८ मात्रांचे अंतर आहे. (शेवटच्या णू नंतर पुढची ओळ सुरू करण्याआधी २ मात्रा इतके थांबावे लागते)
अशाच संयो | गे भरते रं ।गेल खळी
ही ओळ तालात म्हणताना अशीच म्हटली जाते (अ, गे आणि गे वर टाळी घेऊन)
तुमच्या म्हणण्याप्रमाणे
अशाच संयो | गे भरते | रंगेल खळी
असे (अ, गे आणि रं वर टाळी घेऊन) म्हणायचे झाले तर ते तालात म्हणताना खरे म्हणजे
अशाच संयो | गे भरते _ | रंगेल खळी
असे होईल ... म्हणजे ते नंतर दोन मात्रा सोडून रं म्हणावा लागेल. (म्हणजे ते ८ - ८ - ८ असे होईल.)
येथे गणाचा विचार करताना यती आणि यतिभंग हा विचार लागू होत नसावा
असे वाटते. अन्यथा ह्याच नव्हे तर कित्येक कवितांमध्ये यतिभंगच यतिभंग झालेले दिसले असते.
त्या पानावर दिलेली केशवसुतांची कविता पाहिलीत तर तालाची टाळी आणि यती ह्यांचा संबंध नसल्याचे दिसेल असे वाटते.
विशेषतः
।फंद फंद उच् । छृंखल अमुचे । स्तिमित जगाला । ढवळू द्या
ही ओळ पाहा!
चू. भू. द्या. घ्या.