काणे गुरुजींना वंदन
अतिशय उत्तम लेख आहे पण ह्या लेखनाचे प्रयोजन समजून घ्यायचा माझा प्रयत्न चालू आहे. सध्या त्यांचा काही स्मृतिदिन वगैरे आहे काय?
शिक्षक व्यवसायातील कुणीही व्यक्ती ही मला आदरस्थानीच आहे. कोकणातल्या कोठल्यातरी छोट्या खेड्यातून पुण्याच्या पूर्वभागात येऊन (पुण्याच्या पूर्वांचलात असे म्हणण्याची पद्धत नाही, नाहीतर तसेही म्हणता आले असते. ) स्वतःच्या कष्टाने शिक्षक/शिक्षिकेची नोकरी करत करत एकीकडे संध्याकाळच्या वर्गांत जाऊन बी ए .. बी एड पर्यंत मजल मारून अथकपणे शिक्षणव्यवसायात गुंतून राहणारे, त्यात गरजू मुलांच्या शिकवण्या घेणारे , त्यांना प्रगतीपथावर येण्यास हातभार लावणारे कित्येक शिक्षिका/शिक्षक मी जवळून पाहिलेले आहेत. यातील बहुतेक सर्व हे सर्व आपली सांसारिक/कौटुंबिक/सामाजिक जबाबदारी पूर्णपणे स्वतःच्या हाताने सांभाळून भोवतालच्या समाजात राहून हे सर्व करीत आहेत, हे विशेषकरून लक्षात घ्यावेसे वाटते. त्यांना ना कसले पुरस्कार कोण देते ना त्यांचा सत्कार कोण करते, ना त्यांच्यावर कुणी गौरवग्रंथ लिहिते. सरकारी अनुदानित शाळांतून मिळणारा पगार एवढीच त्यांची काय ती कमाई. (तोही अलीकडच्या भूतकाळात काही महिने होत नव्हता असे ऐकले आहे
)
हे सर्व गुरुवर्य आपल्या ह्या अमूल्य योगदानाने आपला समाज घडवीत आहेत.
काणे गुरुजींना वंदन करून ह्या सगळ्यांनाच वंदन केल्याचे पुण्य मला मिळत आहे असे स्वार्थीपणे म्हणावेसे वाटते.
लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.