ह्या लेखनाचे प्रयोजन समजून घ्यायचा माझा प्रयत्न चालू आहे. >>>
ह्या लेखात उल्लेख असलेले श्री‍‍. जयवंत कोंडविलकर डोंबिवलीत राहतात. एक दिवस त्यांची माझी योगायोगाने भेट झाली.
त्यांच्या कामात मला रुची निर्माण झाल्याने, त्यांनी मला संदर्भित पुस्तके वाचायला दिली. मी ह्यापूर्वी भैय्याजींचे नावच काय ते ऐकून होतो. त्यांच्या कामाविषयी मला माहिती नव्हती. मात्र ही पुस्तके वाचल्यावर मला त्यांच्या निस्वार्थ सेवेबाबत नतमस्तक व्हावे असे वाटले. ते वारले तेव्हा एक रुपयाचीही मिळकत मागे सोडून गेले नाहीत. त्यांचे काम हीच त्यांची मिळकत. शेकडो विद्यार्थ्यांच्या मनात राहिलेले ओज-शंकर हीच त्यांची कमाई. त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन करावे म्हणून वरील कविताही लिहीली. मग हा लेख लिहिण्याची इच्छा झाली. त्यामुळे स्वतःला म्हणजे मला जेव्हा जाग आली तोच सूर्योदय, असे समजून हा लेख लिहीला आहे. हेच त्याचे प्रयोजन आहे!

सध्या त्यांचा काही स्मृतिदिन वगैरे आहे काय?>>>>> नाही.