वानप्रस्थाश्रमाविषयी मला काही प्रश्न आहेत.

१९९२ नंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम पत्करला. एकाकी जीवन जगणे पसंत केले.


असे तुम्ही म्हटले आहे. प्रश्न १ :  गृहस्थाश्रम न स्वीकारलेल्या माणसाला पुढचे वानप्रस्थाश्रम सन्यासाश्रम हे स्वीकारता येतात का? मला वाटते हे दोन्ही आश्रम जर मुळात गृहस्थाश्रम असेल तरच अर्थपूर्ण ठरतात.

प्रश्न २. समजा तसे असेल तरी वानप्रस्थाश्रमात एकाकी जगणे कोठे असते. वानप्रस्थाश्रमात माणूस आपल्या घरीच असतो, (एकाकी नसतो) मात्र तो फक्त मागितला तर सल्ला मार्गदर्शन असे करतो. बाकी कशात आसक्ती ठेवत नाही. बरोबर ना?

कृपया खुलासा करावा.
आदरणीय माणसाबद्दल लिहिताना नेमकेपणाने लिहिले तर आदर वाढण्याचीच शक्यता असते, म्हणून हे प्रश्न.