केतन साहेब,
लेखात जे सांगायचे आहे, त्या भय्याजींच्या कर्तृत्वाविषयी आपला काय अभिप्राय आहे, तोही आपण सर्वप्रथम सांगायला हवा होतात.असो. आता आपल्या प्रश्नांविषयी.

गृहस्थाश्रम न स्वीकारलेल्या माणसाला पुढचे वानप्रस्थाश्रम सन्यासाश्रम हे स्वीकारता येतात का? >>> कल्पना नाही.हे वाक्य मी ह्या अर्थाने लिहिले आहे की, १९९२ साली नाशिकमधून ते दापोलीनजीक नानटे येथे कुंटे ह्यांच्या शेतावर एका गवताच्या झोपडीत राहायला गेले. परिचितांना तिथे भेटायलाही, आवश्यकता नसल्यास येऊ नये असेही ते सांगत असत. स्वतःची  उपजीविका शिकवण्या करून चालवत. 

वानप्रस्थाश्रमात माणूस आपल्या घरीच असतो>>> ह्यावर जाणकारच भाष्य करू शकतील. 

आदरणीय माणसाबद्दल लिहिताना नेमकेपणाने लिहिले तर आदर वाढण्याचीच शक्यता असते>>> बरोबर आहे.मी कुठे मोघमपणे काहीतरी लिहिले आहे असे दिसल्यास अवश्य सांगा. दुरूस्त करेन.