सकाळच्या शब्दकोड्याचे काही सांगूच नका. त्यातले शब्द कोणत्याच डिक्शनरीत सापडत नाहीत. तिथे 'सोयीचे' शब्द असतात. त्यांचा एकमेकांशी काही संबंध असतोच असे नाही.  उदा. एकदा आडवा क्ल्यू होता 'कर्ज' याला दोन अक्षरी शब्द हवा होता. तो आहे 'ऋण'. आता त्यातला उभा क्ल्यू होता ' जवान' किंवा 'युवा'. याचे उत्तर आहे 'तरुण'. आता 'ऋण' चा ऋ आणि तरुण चा रू सारखेच का? तरूण हा शब्द कधीतरी तऋण असा लिहिला जाईल का?