उपयोग नाही!

सर्व जवळची नातलग मंडळी तुमच्या सोयीच्या कोणत्याही दिवशी एकत्र या. मस्त जेवा, गप्पा मारा; वडिलांना त्यांच्या आठवणी आणि इतरांना वडिलांविषयीच्या आठवणी सांगायचा कार्यक्रम करा. वडिलांची इच्छा असेल तर वाचलेली दक्षिणा, तुमच्या कुटुंबाला सर्वात जास्त उपयोगी पडलेल्या गरजू कुटुंबाला द्या (मोलकरीण, नोकर किंवा तत्सम). मुलांच्या शिक्षणाची फी, पुस्तकं, कपडे, धान्य किंवा गृहोपयोगी वस्तू अशा स्वरूपात द्या.  उगीच कोणत्याही संस्थेला देणगी देऊन त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पैशाचा विनियोग करण्यापेक्षा हे उत्तम! तुमच्या डोळ्यादेखत तुम्हाला आनंद पाहायला मिळेल.