अधीरता सोयऱ्यांतली, त्या कलेवराला दिसून आली!
कळायच्या आत पार त्याची चिता पहा बेचिराख झाली!!
- छान.
कमळाची द्विपदीही आवडली. पण
कमळ कधी का करेल कुरबुर? किती चिखल हा सभोवताली!
ही ओळ
कमळ कधी का करेल कुरबुर,  "किती चिखल हा सभोवताली!"?
अशी लिहायला हवी. (ओळीचा उत्तरार्ध कमळोक्ती नसेल तर "कमळ कधी का करेल कुरबुर जरी चिखल हा सभोवताली!" अशी . )

अशात ही भैरवी सुचवते.....अरे तुझी सांगताच झाली!

तुझ्या मनातील गूज सांगे तुझ्याच गालावरील लाली!
"सांगता" आणि "तुझ्या" मधील 'च' भरतीचे जाणवतात.
"अरे .... सांगताच..." म्हटल्यावर भैरवी जरा आश्चर्यचकित होऊन, "अरेच्या! तुझी सांगता झाली की. " असे काहीतरी  म्हणते आहे असे वाटू लागते. भैरवीस आश्चर्य का व्हावे? झालेच तर निवेदकास व्हावे.
'ति'च्या मनातील गूज तिच्याच गालावरील लाली सांगणार, इतर कोणाच्या नाही. मग "तुझ्या"ला 'च' केवळ वृत्तभंग होऊ नये म्हणून जोडला आहे असे समजावे का?