कुठल्या विषयावर चर्चा सुरु केली आणि ती कुठे भलतीकडेच भरकटली. श्वासचा ऑस्कर स्पर्धेत प्रवेश झाला की सुटकेचा निःश्वास सोडून पुन्हा एकदा हा विषय मांडीन.
जाता जाता. मराठी वळणाची गोष्ट आणि सगळी पात्रे हिंदी बोलतायत ही गोष्ट मराठी माणसाला खटकली तरी ती एक व्यवहार्य तडजोड आहे हे खरे. सगळ्यांना चांगले लिहिता वाचता आले असते तर मूळ चित्रपट मराठी ठेवून त्यावर हिंदी वा अन्य भाषिक मजकूर अनुवाद सबटायटल स्वरुपात दाखवून बघितला तर बरे. पण तोही उपाय इतका प्रभावी नाही. अलीकडे Passion of Christ मूळ Aramaic भाषेत बनवून सबटायटल्स इंग्रजी दाखवायचा प्रयोग केला गेला. तो अगदीच फसला असे नाही.